तहहयात आणि आमरण - दोन्ही शब्दांचा अर्थ एकच. जिवंत असेतो किंवा मृत्यू येईपर्यंत. पण त्यांचा व्यवहारातला उपयोग बघितला, तर अगदी विरुद्ध आहे. आपण 'आमरण अध्यक्ष' किंवा 'तहहयात उपोषण' असं कधीच म्हणत नाही. शुभसूचक गोष्ट असेल तिकडे तहहयात वापरतो आणि गांभीर्य ठसवण्यासाठी मृत्यूपेक्षा अधिक सूचक गोष्ट कुठली? तेव्हा उपोषण किंवा सत्याग्रह सारख्या गंभीर गोष्टींसाठी 'आमरण' विशेषणाचा आधार घेतो.
आता हे मुद्दाम विचारपूर्वक असं केलं गेलंय का अंतःप्रेरणेने (subconsciously) या शब्दांचे वापर असे रूढ झाले का हा निव्वळ योगायोग आहे?
Subscribe to:
Post Comments (Atom)
4 comments:
No. This is not subconsciously done.
1. 'tahahyat' vapartana jivan adhorekhit ahe. Indiacates long life.
2. 'amaran' vapartana mrityu adhorekhit ahe. Indiactes that the result is death which is close by.
तहहयात ला अजून एक शब्द म्हणजे 'आजीव'...
उदा. 'आजीव सभासद' म्हणजे सभासदात (किंवा संस्थेत -:)) जीव असेपर्यन्त सभासद!!!
~ कौस्तुभ
Tapalo Ramaraya, Netakechi lihave aasech.
Do not leave inbetween this blog.
Mee 'Anonymous' shee sahamat aahe.
Ek gosht maanaaylaa havee. Mee hya shabdaanvishayi asa vichaar kadhi kelaach navhta. Thanks for giving me the impulse.
Post a Comment