Monday, January 22, 2007

स्ट्रेंज बेडफेलोज

'Politics makes strange bedfellows' असे एक प्रसिद्ध वाक्य आहे – शेक्सपिअरच्या The tempest मधील ‘Misery acquaints a man with strange bedfellows’ या वाक्यावर बेतलेले. आजच्या लोकसत्तेत प्रसिद्ध झालेले हे छायाचित्र त्याचे उत्तम उदाहरण म्हणता येईल. पारंपारिक हिंदू धर्मातील प्रथांना कडाडून विरोध करणारे, रामाच्या चित्राची चपलांचा हार घालून मिरवणूक काढण्यापर्यंत द्वेषाने आंधळे झालेले ‘राम’स्वामी नायकार हे द्रविड चळवळीचे प्रणेते. त्यांचेच पट्टशिष्य असणारे आणि नास्तिक असल्याचे जाहीर करणारे करुणानिधी स्वत:ला देवाचा अवतार म्हणवणार्‍या सत्यसाईबाबांशेजारीच मंचावर बसतात आणि इतकेच नव्हे तर पाणीवाटप वादात/क़ृष्णा कालव्याच्या दुरुस्तीसंदर्भात त्यांनी केलेल्या मध्यस्थीमुळे त्यांना ‘देवपुरुष’देखील म्हणतात, याला दुसरे काय म्हणावे?

आता यामुळे ‘दक्षिण भारतीय राज्यांत पाणीवाटपावरुन चाललेल्या भांडणावर केवळ देवच तोडगा काढू शकेल’, हे विधान खरे ठरले म्हणायचे का खोटे? :)

3 comments:

Anonymous said...

nice observation

Anonymous said...

याच विषयावरील एक टिप्पणी येथे वाचता येईल

HAREKRISHNAJI said...

perfect