Tuesday, January 23, 2007

नेदरलँड्स

हॉलंड हे नेदरलँड्सचेच एक दुसरे नाव आहे, अशी माझी आत्तापर्यंत समजूत होती. विकीपीडियावर असंच भटकताना ती दूर झाली आणि कळलं की, खरं तर उत्तर आणि दक्षिण हॉलंड असे नेदरलँड्सचे फक्त दोनच प्रांत आहेत. त्याशिवाय या देशात अजून दहा प्रांत आणि वेस्ट इंडीजजवळील दोन बेटेही (Antilles व अरुबा) येतात.

आता हा हॉलंडविषयक नावांचा घोळ इकडेच संपत नाही. झीलंड हा हॉलंडमधला, चुकलो - नेदरलँड्समधला एक प्रांत. त्याच्यावरुनच न्यूझीलंडला त्याचे नाव मिळाले. तर ऑस्ट्रेलियाचे नाव ब्रिटिशांनी बदलेपर्यंत न्यू नेदरलँड्स होते. सीऍटलचे पूर्वीचे नाव जरी न्यूयॉर्क असले, तरी न्यूयॉर्कचे मूळ नाव? - न्यू ऍमस्टरडॅम!

4 comments:

कृष्णाकाठ said...

Nandan,

Mast Mahiti ahe...ekdum navin.

asech ajun ek mhanje...dakshil ameriketeel Venezuala deshache nav Italy madhalya Venice City varun padle ahe.

Koham.. said...

changli mahiti ahe

अनु said...

Mala vatat hote ki Netherland deshalach hallend mhantat. Ameriket hallend navache shahar pan ahe na?
Ha sagala navancha gondhal kuthun ala asava bare?Tasech west indies madhe 'indies' ka anale asave?

Sudeep Mirza said...

interesting1!