Tuesday, July 10, 2007

मुंबईतील सात आश्चर्ये

हरेकृष्णाजींच्या या पोस्टवर प्रतिक्रिया म्हणून मुंबईतील सात आश्चर्यांची ही यादी--

१. गर्दी (> ३०,००० माणसे/चौ.किमी)

२. डबेवाले

३. बेस्ट

४. बॉंबस्फोटाच्या दुसऱ्याच दिवशी भरून वाहणारी ऑफिसेस

५. धारावी

६. रात्री अडीचलाही चर्चगेटबाहेर मिळणारा भुर्जीपाव नि फ्रँकी आणि बेरीनो पुलाव, चायनीज डोसा, जैन चिकन, मिरची आईस्क्रीम असे भूतलावर इतर कुठेही न मिळणारे अचाट पदार्थ.

आणि शेवटचे पण नॉट द लीस्ट

७. महिला स्पेशल, ८:२२ विरार, ५:२७ टिटवाळा, "शिवा ताठे", चौथी सीट, गोरेगावला हमखास स्लो होणारी फास्ट गाडी, टिळक ब्रिजवर जायचा 'शॉर्टकट' आणि डबा कितीही गच्च भरलेला असला तरी प्लॅटफॉर्मवरच्या धावत्याला काडीचा आधार देऊन वर खेचून घेणारे मुंबैकर.

7 comments:

abhijit said...

अफलातून लिहिलय! खरंच मुंबई आश्चर्यजनक आहे!
पण माझ्यामते तू मुंबईचं एकमेवद्वितीय आश्चर्य नमूद करायचे विसरलास का? सार्वजनिक संकटकाळी मुंबईकर एकमेकांच्या जीवाला जीव देऊन जी मदत करतात ती फारच प्रशंसनीय आणि अनुकरणीय आहे. जगात असे दुसरे उदाहरण नसावे. पटतय का तुला? :-)

Anand Ghare said...

हरेकृष्णजींची सात आश्चर्ये ही खरे तर सात वैफल्ये म्हणता येतील. तू नमूद केलेली आश्चर्ये आशेचे किरण दाखवतात. शाबास.

HAREKRISHNAJI said...

Thank Nandan for the list.
It's just perfect. I will click photographs of the items mentioned and post it on the blog.

Dear Abhijit,

Yes. It' the unique quality of Mumbaikar's.

And Dear Anand,

You are right. I never realised from that angle.

But it's not a list, just hints and not all items are out of frustations. Mumbai local trains are lifelines of the city. They carry millions of passenges daily regularly, beyond their capacity. Dharavi inspite of being largest slum is Asia has lots of inherient qualites, Hawkers and food vendors are no doubt naiusance to public and pedestrians, but large popolation is dependent on them for the daily needs
And regarding unauthorised contructions, it's a open secret.

Yogesh said...

घारेसाहेबांशी सहमत. आणि पुलावाचा फोटोही जबरा... :)

कोहम said...

masta....mumbai mazi ladaki...

Nandan said...

आपल्या प्रतिक्रियांबद्दल आभारी आहे. अभिजीत, सहमत आहे. ते राहिलं लिहायचं खरं तर :(.

Anonymous said...

Hi, Found a cool news widget for our blogs at www.widgetmate.com. Now I can show the latest news on my blog. Worked like a breeze.